काशी विश्वनाथाच्या आशीर्वादाने आ.राजेश पवारांचा आगामी काळ निश्चितच सुकर होईल – खा.अशोक चव्हाण
नायगाव/प्रतिनिधी : भगवान शेवाळे
काशीला विश्वनाथाच्या दर्शनासाठी जाणं हा आपल्या भाग्याचा विषय असून, सर्व सामान्य भाविकांना काशीपर्यंत नेऊन त्यांची सर्व व्यवस्था करणं हे खरंच खूप कौतुकास्पद काम आहे.जवळपास दोन ते अडीच हजार भाविकांना जाण्यासाठी या यात्रेची पूर्वतयारी,त्यांचं रिझर्वेशन जेवणाची, राहण्याची व्यवस्था करणं हे वाटतं तितकं सोपं काम नाहीये.मलाही आमदार राजेश पवार यांच्याकडून हे शिकावं लागणार असल्याची भावना व्यक्त करत काशी विश्वनाथाच्या आशीर्वादाने आमदार राजेश पवारांचा आगामी काळ निश्चितच सुकर असेल असे सूचक विधान माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे खासदार अशोकराव चव्हाण यांनी केले.शनिवार (ता.३) रोजी मुदखेड येथील रेल्वे स्थानकावर आमदार राजेश पवार यांच्या देव – देश – धर्म या संकल्पनेतून मतदारसंघातील दोन हजार भाविकांना काशीयात्रेसाठी पाठवण्यात आले.याप्रसंगी आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी सद्गुरू नराशाम महाराज मठ संस्थान (लघु आळंदी, ता. मुखेड),108 शिवाचार्य विरुपाक्ष महाराज मुखेडकर यांच्यासह अनेक संत मंडळी, पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
पुढे बोलताना खा.चव्हाण म्हणाले,नायगाव मतदारसंघातचे आमदार राजेश पवार हे अशा प्रकारचं धार्मिक कार्य सातत्याने करत असतात.केवळ आज हा उपक्रम त्यांनी हाती घेतला नसून मागील अनेक वर्षापासून या पवार दमपत्यांनी त्यांच्या भागातील भाविकांना अनेक तीर्थस्थळांच दर्शन घडवण्याचं कार्य केलं आहे. शासनाने देखील अशाप्रकारची ज्येष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन वारी ही योजना सुरू केली असून, या आधीच राजेश पवार यांनी असा उपक्रम हाती घेत शासनाच्याही एक पाऊल पुढे टाकण्याचं काम केलं आहे. सरकारने तुमच्याकडूनच प्रोत्साहन घेऊन ज्येष्ठ नागरिकांसाठी तीर्थक्षेत्र दर्शन योजना आणली आहे. असही त्यांनी यावेळी स्पष्ट करत आमदार राजेश पवार यांच्या या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. उपरोक्त कार्यक्रमानंतर सकाळी साडे अकरा दरम्यान काशीसाठी रवाना होणाऱ्या या विशेष ट्रेनला मुदखेड स्थानकावरून खा.अशोक चव्हाण यांच्यासह आमदार राजेश पवार,सौ.पूनमताई पवार,अमरनाथ राजूरकर,राजेश कुंटुरकर यांनी हिरवा झेंडा दाखवला.
आमदार राजेश पवार यांनी स्वतः अनेक महिला भगिनींच्या बॅगा उचलून रेल्वेत ठेवल्या. हे पाहून अनेक माता भगिनींच्या मुखातून “माझ्या बापूने आम्हाला काशी दाखवली”असा सूर निघत होता. हा आशीर्वाद नक्कीच आमदार राजेश पवार यांना त्यांच्या या धार्मिक कार्याला पाठबळ देईल.