जोमेगावच्या सरपंचपदी कमलबाई शिंदे यांची बिनविरोध निवड..
नांदेड/ भगवान शेवाळे
लोहा तालुक्यातील जोमेगाव ग्रामपंचायतच्या सरपंपदी श्रीमती कमलबाई संभाजी पाटील शिंदे यांची मंगळवारी ( ता.०९) बिनविरोध निवड करण्यात आली.निवडीनंतर त्यांच्या समर्थकांनी गुलाल उधळत आनंदोत्सव साजरा केला.
गोदावरीबाई शिंदे यांनी ठरल्याप्रमाणे सरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त पदांवर श्रीमती कमलबाई शिंदे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी भोसीकर यांनी काम पहिले.तर ग्रामसेवक श्रीरामवार, तलाठी संतोष अस्कूलवार,मा.सरपंच गोदावरीबाई शिंदे,मा. उपसरपंच सपना भुरे, सदस्या अश्विनी शिंदे पदमिनबाई गव्हाणे,उपसरपंच भाग्यश्री शेट्टे,पंडीत कापसे,चेअरमन दिगंबर शिंदे,सुधाकर शिंदे,पोलिस पाटील मारोती पांचाळ,भास्कर पाटील शिंदे, प्रभाकर पाटील , गणु पाटील शिंदे, धोंडीबा पाटील,दशरथ शिंदे, प्रभाकर शिंदे,मोहन शिंदे, बालाजी शिंदे, संजीव शिंदे,विठ्ठल शिंदे, नागोराव शिंदे, आदिनाथ शिंदे, मारोती शिदे, रामेश्र्वर शिंदे,साई शिदे, श्रीकांत शिंदे,दत्ता महाराज, पूरभाजी शेट्टे, माधव कमजळे,बालाजी कमजळे ,कोंडिबा गव्हाणे, मनोहर भूरे, पवण भुरे,सुनील सोनकांबळे यांच्यासह गावातील अनेक मंडळी उपस्थित होते.