महत्वाचे

आ.राजेश पवार यांना मंत्रीपद मिळावं यासाठी गंगनबीडच्या शंभू महादेवाला अभिषेक..

नायगांव/प्रतिनिधी : भगवान शेवाळे

राज्यातल्या विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या निवडणुकीमध्ये महायुतीला घवघवीत यश मिळाल आहे.मात्र अद्यापही नवं सरकार स्थापन झालं नाही. मुख्यमंत्री पदाबाबतही अजून संभ्रम असल्याने अनेक विजयी आमदारांचे कार्यकर्ते आपापल्या आमदारांना मंत्रिपद मिळाव यासाठी ठिकठिकाणी देवाला साकडं घालत आहेत.नायगाव विधानसभेचे विद्यमान आमदार राजेश पवार हे या मतदारसंघात दुसऱ्यांदा निवडून आले असल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी आता त्यांना मंत्रिपद मिळावं यासाठी नायगाव तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान असलेल्या गंगनबीड येथील शंभू महादेवाला सोमवारी सकाळी अभिषेक करून साकडे घातले आहे.

आ.राजेश पवार यांनी 2014 साली या मतदारसंघातून पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली होती त्यात त्यांचा पराभव झाला होता मात्र ते पराभव होऊनही पुढचे पाच वर्ष जनतेच्या संपर्कात राहिले. केंद्रामध्ये भाजप आणि राज्यांमध्ये भाजप,शिवसेना सरकार असल्याने आमदार पद नसतानाही त्यांनी अनेक लोकोपयोगी कामे या नायगाव मतदारसंघात केली. त्यामुळे 2019 च्या विधानसभा निवडणूकीमध्ये ते भरघोस मतांनी विजयी झाले.

मात्र राज्यात त्यावेळी सत्तेची समीकरणे बदलली आणि महाविकास आघाडीचे सरकार उदयास आले.आणि विशेष कोरोनाचा काळ असल्याने दोन ते अडीच वर्षे विकास कामांना अडचण निर्माण होत होती. पुन्हा अडीच वर्षानंतर राज्यात सत्ता बदलून भाजप,शिवसेना ( शिंदे गट) सत्तेत आल्याने आमदार राजेश पवार यांनी आपल्या मतदारसंघात भरघोस निधी मंजूर करून घेत ग्रामीण भागाचा कायापालट केला.गेली अनेक दशके रस्त्यासाठी फरपट होत असलेल्या मतदार संघातील अनेक गावांना त्यांनी कोट्यांशी रुपये देऊन रस्त्याच जाळ विणलं. बरबडा या ठिकाणी रस्त्यासाठी मोठी वाताहात निर्माण होत होती. अडचण लक्षात घेत आ. राजेश पवार यांनी तब्बल 16 कोटी रुपये या रस्त्यासाठी दिले.विशेष पाच कोटी रुपये बरबडा येथील मुख्य रस्त्यासाठी मंजूर करून आणले.स्वातंत्र्यानंतर अनेक वर्ष ज्यांनी सत्ता भोगली त्यांना भायेगाव ते बरबडा पुलाचे काम शक्य झालं नाही परंतु आमदार राजेश पवार यांनी आपल्या आमदारकीच्या पहिल्याच टप्प्यात हे अतिशय अवघड असणार काम हाती घेत आज ते पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

त्यामुळे 2024 च्या विधानसभा निवडणुकीत ग्रामीण भागातील जनतेने दुसऱ्यांदा त्यांना आमदारकी बहाल करत विधिमंडळात पाठवलं आहे. त्यांच्या विकास कामाची चर्चा अनेकदा मतदार संघाबाहेर देखील झाली आहे. जिल्ह्यातील अनेक मतदारसंघातील जनतेने त्यांच याबाबत तोंड भरून कौतुक देखील केलं आहे. विशेष म्हणजे त्यांनी देवदेशधर्म या संकल्पनेतून मतदार संघातील अनेक भाविकांना काशी यात्रा दाखवली. कदाचित शासनाने देखील त्यांचा हा प्रयोग पाहून तीर्थक्षेत्र योजना आणली असावी अस म्हणत खुद्द माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनीही आमदार राजेश पवार यांचं कौतुक केलं होतं. त्यामुळे अनेक सामाजिक प्रश्नांची जाण असणाऱ्या या आमदारांना एखादं मंत्रिपद देऊन नांदेड जिल्ह्याचे पालकत्व देण्याची मागणी नायगाव तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

नायगाव तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र गंगनबीड येथील शंभू महादेवाच्या चरणी अभिषेक करून अनेकांनी आमदार राजेश पवार यांना मंत्रीपद मिळावं यासाठी शंभू महादेवाकडे साकडे घातले आहे.यावेळी तालुकाध्यक्ष दत्ता पाटील ढगे,महिला तालुकाध्यक्ष जयश्रीताई नरवाडे,शहराध्यक्ष पल्लवी पाटील वडजे, शरद पाटील, प्रकाश पाटील हेंडगे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!