महत्वाचे

घुंगराळयात खंडोबा यात्रेची जय्यत तयारी – वसंत सुगावे यांची माहिती

जंगी कुस्त्यांचे सामने,कृषी व पशु प्रदर्शन,सांस्कृतिक कला महोत्सव आदी कार्यक्रमाचं भरगच्च आयोजन

नायगांव/प्रतिनिधी : भगवान शेवाळे

नायगाव तालुक्यातील घुंगराळा येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही खंडोबा देवाची यात्रा भरणार असून दरवर्षीप्रमाणे यंदाही यात्रेत जंगी कुस्त्यांचे सामने,कृषी व पशु प्रदर्शनाचे,सांस्कृतिक कला महोत्सव या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशसरचिटणीस तथा प्रभारी सरपंच वसंत सुगावे पाटील यांनी दिली आहे.

शनिवार दिं.7 डिसेंबर रोजी यात्रा सुरू होणार असून याच दिवशी कुंटूर येथून खंडोबा देवाच्या पालखीचे घुंगराळा येथे दुपारी आगमन होईल व सायंकाळी 4.00 वा. खंडोबा मंदिरावर गावकऱ्यांच्या वतीने सामूहिक आंबील जेवणाचा कार्यक्रम होईल.

दिं.8 डिसेंबर रोजी दुपारी 1.00 वा. जि. प. हायस्कुल घुंगराळ्याच्या मैदानावर जंगी कुस्त्यांचे सामने होतील या सामन्यांचे उद्घाटन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते व अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमात होईल.या कार्यक्रमास जि. प. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी माळोदे साहेब,निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर ,जि. प. चे उपमुख्यकार्यकारी अधिकारी मुक्कावार साहेब,एम एस इ बी चे अधीक्षक अभियंता श्री. जाधव साहेब यांच्यासह अनेक विभागाचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहतील.

दिं.8 डिसेंबर रोजीच सायंकाळी 7.00 वा कुस्त्यांचे सामने संपन्न होतील या सामान्यांचे बक्षीस वितरण पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप साहेब यांच्या हस्ते व पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार , अतिरिक्त जिल्हाधिकारी बोरगावकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल. या कुस्ती स्पर्धेत वसंत सुगावे पाटील यांच्या तर्फे अखेरची मानाची “खंडोबा केसरी” कुस्ती होईल यात विजयी पहेलवानस 21,111 रुपयांचे पाहिले बक्षीस राहील,तर यात्रा समितीच्यास वतीने द्वितीय बक्षीस11,111 रु. व तृतीय बक्षीस 7,111 रु. राहील.

दिं.9 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वा. कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन आ.प्रतापराव पा.चिखलीकर यांच्याहस्ते व आ. राजेश पवार यांच्या अध्यक्षतेखालील कार्यक्रमात होईल तर पशु प्रदर्शनाचे उद्घाटन खा. रवींद्र पा. चव्हाण यांच्या हस्ते व भाजपा नेते राजेश कुंटुरकर यांच्या अध्यक्षतेखालील कार्यक्रमात होईल. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे प्रकल्प संचालक तुबाकले साहेब, यांच्यासह जिल्हा परिषद, कृषी विभाग,पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी,विविध पक्षांचे राजकीय पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.तसेच दिं.9 डिसेंबर रोजी सायंकाळी 6.00 वा.सांस्कृतिक कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.दिं.10 डिसेंबर रोजी रात्री 9.00 वा. खंडोबा देवाच्या पालखीचे कुंटूर कडे प्रस्थान होईल.यात्रेच्या पार्श्वभूमीवर गावात ग्रामपंचायतच्या वतीने साफसफाई, पाण्याचे नियोजन,दिवाबत्तीची व्यवस्था, यात्रेत येणाऱ्या दुकानदारांकरिता दुकाने मांडण्यासाठी चे नियोजन आदी कामे प्रामुख्याने करण्यात येत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!