आमदार राजेश पवारांना मंत्रीपद मिळावे म्हणून आलूवडगावकरांनी नाथोबा देवाला घातले साकडे…
नायगाव /भगवान शेवाळे
आमदार राजेश संभाजी पवार हे सलग दुसऱ्यांदा विधानसभेत नायगाव मतदार संघातून विक्रमी मतांनी विजयी होवून पोहचले आहेत.विकासाला प्राधान्य देत सर्वसामान्य माणसांशी नाळ जोडून भाजप मध्ये पक्षाशी एकनिष्ठ राहून कामदार म्हणून वावरणाऱ्या आमच्या गावच्या भूमीपुत्राला पक्षाने मंत्रीपद बहाल करावे या मागणीसाठी आलूवडगावकरांनी मंगळवारी दुपारी तीन वाजता गावचे ग्रामदैवत असलेल्या नाथोबा मंदीरात पूजा, अभिषेक,आरती, महाप्रसाद अशा कार्यक्रमांचे आयोजन करून नाथोबा देवाला साकडे घातले.
आमदार राजेश संभाजी पवार हे आलूवडगावचे भूमीपुत्र आहेत.दुसऱ्यांदा आमदार करताना भूमीपुत्रांनी देखील त्यांना मतदानातून खंबीरपणे साथ दिली आहे.स्व.संभाजीराव लक्ष्मणराव पवार यांनी पक्षवाढीसाठी खुप प्रयत्न केले.पक्षनिष्ठेने त्यांनी पक्षात वेगळी ओळख निर्माण केली होती.त्याच धर्तीवर आमदार राजेश पवार यांनी वाटचाल सुरू ठेवली आहे.आमदार असताना राजेश पवार यांनी केलेला सर्वांगीण विकास लक्षवेधी ठरला आहे.मंत्री झाल्यानंतर ते नायगाव मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलतील त्यामुळे त्यांना पक्षाने मंत्रीपद बहाल करावे अशी मागणी करीत आलूवडगावकरांनी मंगळवारी नाथोबा मंदीरात पूजा, अभिषेक, आरती, महाप्रसाद अशा कार्यक्रमांचे आयोजन करून नाथोबा देवाला साकडे घातले आहे.
यावेळी जिवनराव पा.पवार, सुमनबाई पवार,कमळबाई इंगोले, माजी सरपंच संभाजीराव पवार, माधवराव इंगोले, राजेश इंगोले, नामदेव पवार, रामराव इंगोले, नागनाथ इंगोले, सुर्यकांत कोठाळे,सटवा पाटील,महेबब पटेल, व्यंकटराव जाधव, शिवसेनेचे शिवाजीराव पन्नासे,वसंतराव पाटील-गडगेकर,दिलीप इंगोले,बंडू पा.वडजे, शिवाजी पा.इंगोले, जगदीश जाधव, बालाजी कोठाळे यांच्यासह शेकडो ग्रामस्थांची उपस्थिती होती.