श्री जगद्गुरू शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती 1008 आज नांदेडमध्ये..
नायगाव /प्रतिनिधी : भगवान शेवाळे
ज्योतीष्ठाधिश्वर जगदगुरू शंकराचार्य स्वामी श्री अविमुक्तेश्वरानंद सरस्वती 1008 हे आज दि.4 डिसेंबर रोजी दुपारी नांदेडमध्ये दाखल होणार आहेत. दुपारी 3ः30 वाजता नांदेड विमानतळावरून कंधार तालुक्यातील हळदा येथील पंचमपीठ सिध्दतीर्थधाम आश्रम येथे मुक्कामी असणार आहेत.परिसरातील भाविक- भक्तांनी त्यांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
बीड जिल्ह्यातील परळी येथे श्री दत्तात्रय भगवान त्रिमुखी भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा व किर्तन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.त्यानिमित्ताने विविध साधु-संत महाराजांच्या उपस्थितीत भजन, किर्तन आदी धार्मीक कार्यक्रम सुरू आहेत. दि.5 रोजी श्री. जगद्गुरू शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती 1008 हे कंधार तालुक्यातील हळदा येथून बीड जिल्ह्यातील परळी धर्मापुरी येथील कार्यक्रमासाठी रवाना होणार आहेत.
त्यामुळे परिसरातील भावीक-भक्तांनी त्यांचे आशिर्वाद घेण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन हळद तालुका कंधार येथील सिधतीर्थ धाम मठाचे महंत स्वामी विशुद्धनंद महाराज यांनी केले आहे.