महाराष्ट्र

सासरी जाईन तर मतदान करूनच..!!

बरबड्यात नववधूने बजावला मतदानाचा हक्क

बरबडा/भगवान शेवाळे :

देशात लोकशाहीचा मोठा उत्सव एकीकडे पार पडत असताना दुसरीकडे लग्नसराईचा देखील मोठा हंगाम सुरू आहे. यातच 26 एप्रिल म्हणजे लग्नाची मोठी तारीख.आणि याच दिवशी लोकसभा निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्यातल मतदान पार पडलं.अनेक जण पाहुण्या – रावळ्यांच्या लग्नात व्यस्त असताना मात्र नायगाव तालुक्यातील बरबडा येथील एका नववधूने लग्नाच्या भोवल्यावर चढण्याआधी मतदानाच्या राष्ट्रीय कर्तव्याला प्राधान्य दिलं आहे. नायगाव तालुक्यातील बरबडा येथील वैष्णवी गोपाळ  चूनुकवाड या नववधुने आधी लग्न लोकशाहीचे म्हणत शुक्रवारी (ता.२६)  स्वतःच लग्न लागण्या अगोदर मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलं.दरम्यान वैष्णवी चुनुकवाड हिचा विवाह मुखेड तालुक्यातल्या बेळी येथील विठ्ल गजलवाड यांच्यासोबत शुक्रवारी बरबडा येथे मोठ्या थाटामाटात संपन्न झाला असून, याच दिवशी लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया पार पडली. 

आपल्या लग्नासाठी नटून थटून कपाळावर बाशिंग बांधून आई-वडिलांसह ही नववधू मतदान केंद्रावर दाखल होताच तिने उपस्थित सर्वांचे लक्ष वेधून घेतले.रांगेत लागून तिने आपल्या कुटुंबातील सदस्यांसह लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावून राष्ट्रीय कर्तव्य बजावल्याची नांदेड टाइम्स शी बोलताना दिली.

लग्नमंडपात पोचण्याची धावपळ असताना नववधू झालेल्या वैष्णवीने मतदानाला पहिले प्राधान्य दिले. आपल्या कुटुंबातील सदस्यांसह ही नवरी सकाळीं साडे दहा वाजता थेट ग्रामपंचायत कार्यालयातील मतदान केंद्रावर पोचली. मतदान करूनच ही नववधू आपल्या पाहुण्यासह बोहल्यावर चढण्यासाठी रवाना झाली. दरम्यान वैष्णवी आणि विठ्ठल या नवदांपत्यासाठी त्यांच्या लग्नाचा व मतदानाचा हा दिवस आयुष्यभर स्मरणात राहील.

लोकशाहीत मतदान हे खूप महत्त्वाच आहे..हा आपला हक्क आहे.येणारा भविष्यकाळ हा आपल्या मतदानावर अवलंबून असतो त्यामुळे प्रत्येकाने घरात न थांबता मतदान करून आपलं राष्ट्रीय कार्य पार पडाव.. आज माझं लग्न आहे. परंतु मी माझ्या लग्नाआधी या राष्ट्रीय कार्याला राजाने दिला आहे. त्यामुळे आधी लग्न लोकशाहीचा लावूनच मी माझ्या सासरी जाणार आहे.आजचा दिवस हा खूप महत्त्वाचा आहे माझ्यासाठी कारण माझ्या लग्नाची दिवशी लोकसभा निवडणुकीचे हे मतदान पार पडत आहे. हा दिवस माझ्यासाठी स्मरणात राहील अशी प्रतिक्रिया नववधू वैष्णवी हिने दिली.

यादरम्यान बरबडा ग्रामपंचायत बुथवर राष्ट्रीय कार्य बजावण्यासाठी गेलेल्या नववधूचे कव्हरेज घेण्यासाठी गेलेल्या माध्यम प्रतिनिधींना मात्र तेथील झोनल अधिकाऱ्यांकडून अपमानास्पद वागणूक मिळाली असून या संदर्भात तीव्र निषेध व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!