बालभारती अभ्यास मंडळावर प्रिती कंठके यांची निवड
नायगाव/भगवान शेवाळे
जिल्हा परिषद हायस्कूल विष्णुपुरी येथील शिक्षिका प्रिती विलासराव कंठके यांची महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व संशोधन मंडळ बालभारती पुणेच्या सदस्यपदी नुकतीच निवड झालेली आहे.
राज्यातील पायाभूत स्तर ते इयत्ता बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तकाची व इतर शैक्षणिक साहित्याची निर्मिती करण्याचे काम पुणे येथील महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ बालभारती ही संस्था करते.समाज मानाचा कानोसा घेऊन समाजाची व उद्योगाची गरज विचारात घेऊन तयार केलेल्या व काळानुसार सुसंगत ठरतील तसेच विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीला चालना देतील अशा प्रकारचे कृतीप्रधान पाठ्य साहित्य पाठ्यपुस्तक मंडळामार्फत तयार करण्यात येतात.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 वर आधारित येऊ घातलेल्या नवीन राज्य अभ्यासक्रमावर आधारित पाठ्यपुस्तक निर्मितीचा कार्यक्रम मंडळाने हाती घेतला आहे. त्या अनुषंगाने मंडळाच्या इंग्लिश या विषयाच्या समितीवर सन 2024 – 25 या वर्षापासून त्यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.राज्यातील शिक्षण घेणाऱ्या लक्षावधी मुलांना निर्दोष व दर्जेदार पाठ्यपुस्तके मिळाली पाहिजेत या निर्मितीच्या कामे त्यांची नियुक्ती ही कौतुकास्पद बाब आहे.या निवडीमुळे सर्व शिक्षण क्षेत्रातून त्यांच कौतुक केले जात आहे.