नांदेड
कोलंबीत उद्या गुरुपौर्णिमा उत्सव तसेच प्रसाद बन महाराज पुण्यतिथी सोहळा
नायगाव/भगवान शेवाळे
नायगाव तालुक्यातील कोलंबी येथे उद्या रविवार दिनांक २१ रोजी प्रसाद बन महाराज पुण्यतिथी सोहळा तसेच गुरुपौर्णिमेनिमित विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री १०८ डॉ.प्रसादबन गुरु रामेश्वरबनजी महंत महाराज श्री दत्त संस्थान क्षेत्र कोलंबी यांची उद्या ४७ वी पुण्यतिथी असुन,यानिमित्य सकाळी ठीक १० वाजता समाधी अभिषेक पूजा व महाप्रसादाचे आयोजन केले आहे.तसेच गुरु पोर्णिमा महोत्सव देखील साजरा करण्यात येणार असून या कार्यक्रमासाठी नांदेड जिल्हा व पंचक्रोशीतील सर्व संत,महंत गुरु,भक्तगण यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थानचे मठाधिपती श्री १०८ श्री महंत यदूबनजी महाराज यांच्यासह अध्यक्ष तथा सर्व विश्वस्त व ग्रामस्थ यांनी केले आहे.